गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.

परिस्थिती अशीच राहिली तर करोनाची लाट नव्हे तर लाटा येतील, असा इशारा राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे.

अशाच प्रकारची चिंता आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टरांनीही व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले.

निवडणूक निकालानंतर तर जल्लोष सुरु होता.या सर्वात कुठेही सुरक्षित अंतर वा मास्क वापरण्याचे पालन झाले नव्हते.

याशिवाय लग्नसमारंभ तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात सरकारने लागू केलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही.

मुंबईत लोकल प्रवास सर्वांसाठी सुरु झाला आहे. मंदिरापासून हॉटेल व बार रेस्तराँ जोरात सुरु आहेत. यातूनच पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

एका रुग्णामागे संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे आदेश सरकारने जारी केले. त्याचेही कुठे पालन होताना दिसत नाही.

“आम्ही राज्य कृती दल म्हणून या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणल्या आहेत. यावर कठोर कारवाई केली नाही तर करोनाची दुसरी लाट आल्याशिवाय राहाणार नाही,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितल