रत्नागिरी दि.22:- जल जीवन मिशन कार्यक्रम केंद्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. गावांतील पाणी पुरवठा विषयक यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, पाणी गुणवत्ता विषयक कामांची खात्री, ग्रामपंचायत/ गाव पाणी व स्वच्छता समिती मार्फत करण्यासाठी ग्रामपंचायत / गाव पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य, सरपंच, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, गावातील पाच महिला आणि ग्राम आरोग्य पोषण आहार समिती सदस्यांना पाणी व स्वच्छतेच्या कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल दुरुस्ती याबाबत माहिती व्हावी. तसेच विविध टप्प्यावर भागधारकांची जबाबदारी व भूमिका निश्चित होण्यासाठी गुरुवार, 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. कै.शामरावजी पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी आवार येथे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी कळविले आहे.