सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात एकाच वेळी 24 रूग्ण सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

गुहागर – चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली हे गाव आहे. याच गावात दोन दिवसापूर्वी सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला होता. त्याच वेळेला चिखली हे हॉट स्पॉट होणार अशी सगळीकडे चर्चा होती. यात आज चिखली येथे तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात गुहागर तालुक्यात एकूण 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यातील दोन श्रुंगारतळी येथील आहेत. आता गुहागर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 48 झाली आहे.

कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून देखील लोकं गांभीर्य दाखवत नाहीयेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. सरकारनं दिलेले निर्देश पाळणं आता नितांत आवश्यक आहे.

Advt.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*