राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट!!

मुंबई हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तर हवामान विभागाने 11 जुलै ते 14 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केले आहे.

11 जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

12 जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

13 जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर या दिवशी परभणी, हिंगोली,नांदेड पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

14 जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर जालना परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास नक्कीच काहीप्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*