दापोलीतील पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत खड्ड्यातून जाणार …

दापोली : दिवाळीच्या सुट्टीमध्ये दापोली मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून बरेचसे पर्यटक येत असतात.

दापोलीतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे बरेचसे रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यापैकी दापोली -खेड रस्ता, दापोली- हरणे बंदर रस्ता, मुरुड रस्ता असे अनेक पर्यटकांसाठी आवश्यक रस्ते खराब झाले आहेत.

परंतु अशा खराब रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष नाही ते दुरुस्त करण्यासाठी देखील कोणतीही कारवाई नाही.

कमीत कमी तत्पुरते खड्डे योग्य कॉलिटीने भरावेत असे स्थानिक व्यावसायिक आणि लोकांचे म्हणणे आहे.

पर्यटन व्यवसायातून दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, परंतु पर्यटनासाठी आवश्यक आपण रस्ते देखील पर्यटकांना देऊ शकत नाही असे स्थानिक लोकांचे आणि पर्यटकांचे म्हणणे आहे.

लवकरात लवकर पर्यटकनासाठी आवश्यक असे रस्ते करावेत आणि रस्त्यावरील खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवावेत असे लोकांचे म्हणणे आहे.

दापोली मध्ये येणाऱ्या पर्यटकांना खराब रस्त्यामुळे खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

बरेच ठिकाणी बीएसएनएल सोडलं तर कोणताच नेटवर्क नाही आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचा जीपीएस लोकेशन ॲप चालत नाही.
लवकरात लवकर इतर मोबाईल नेटवर्क देखील ठीक ठिकाणी चालू व्हावेत असं पर्यटकांचा आणि तेथील स्थानिक लोकांचे म्हणणं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*