रत्नागिरी – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 15 मार्च 2021 रोजी सायंकाळी 06.30 वाजता नांदगांव, ता. कणकवली, जि. सिंधुदूर्ग येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.रात्रौ 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

मंगळवार 16 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता रत्नागिरी जिल्हा नमन मंडळासोबत चर्चा. (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी). सकाळी 10.30 वाजता पाली, निवळी व लगतची गांवे तसेच लांजा नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अडीअडचणींबाबत आढावा बैठक. (स्थळ : पाली ग्रामंपचायत, पाली, ता.जि. रत्नागिरी). सकाळी 11.30 वाजता पाली येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता ओम साई क्रिडा मंडळास भेट.(स्थळ : साळवी स्टॉप, रत्नागिरी). दुपारी 12.30 वाजता खरवते येथील खाजगी शाळेच्या अडी-अडचणीबाबत बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 01.30 वाजता रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन समवेत बैठक. ((स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी 02.00 ते 02.30वाजता राखीव. दुपारी 02.30 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने जयगड, ता.जि. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 03.30 वाजता जयगड परिसरातील जिंदाल प्रकल्प व आंग्रे पोर्ट प्रकल्प संदर्भात ग्रामस्थांच्या अडीअडचणींबाबत आढावा बैठक.(स्थळ : जयगड ग्रामपंचायत, जयगड, ता.जि.रत्नागिरी).सायंकाळी 05.00 वाजता जयगड येथून मोटारीने आगवे (सावर्डे) ता. चिपळूण, जि. रत्नागिरी कडे प्रयाण. सायंकाळी 06.30 वाजता श्री. केतन पवार, रा. सावर्डे यांची कन्या चि.सौ. कां. मानसी व चि. प्रणित यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : हॉटेल पॅसिफीक, आगवे (सावर्डे), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. रात्रौ सोईनुसार आगवे (सावर्डे) येथून मोटारीने चिपळूणकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व राखीव. रात्रौ 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथून मोटारीने चिपळूण रेल्वे स्थानक कडे प्रयाण. बुधवार 17 मार्च 2021 रोजी पहाटे 12.20 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव – मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण