आ.भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव जि. प.चे नवे अध्यक्ष

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांच्या नावाची निवड करण्यात आली असून याबाबत पक्षाच्या सभेमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांची निवड केली गेली आहे.

नवनिर्वाचित जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव

जिल्हा परिषदेच्या आजच्या निवडणूक प्रक्रिये नंतर अधिकृत अध्यक्ष, सभापती याची नावे जाहीर केली गेली. उपाध्यक्ष व बांधकाम व आरोग्य सभापती उदय बने (रत्नागिरी),

नवनिर्वाचित जि. प. उपाध्यक्ष उदय बने

उपाध्यक्षांच्या अधिकारात असलेले कृषी व पशुसंवर्धन हा स्वतंत्र विभाग करण्यात आला असून या विभागाच्या सभापतीपदी दापोलीच्या रेश्मा झगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर (लांजा), महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर (राजापूर), समाज कल्याण सभपती परशुराम कदम ( रत्नागिरी), कृषी व पशुसंवर्धन रेश्मा झगडे (दापोली) तर स्थायी समितीमध्ये महेश उर्फ बाबू म्हाप, रोहन बने, अण्णा कदम, स्वप्नाली पाटणे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद रत्नागिरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*