नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

पक्षाने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी दिली आहे.

पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला.

या पोटनिवडणुका महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी होत आहेत.

उमेदवारांची नावे:
संदीप दिवाकरराव जोशी
संजय किशनराव केनेकर
दादाराव यादवराव केचे

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी हे पत्रक जारी केले.