ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने शेतकरी व कामगारांच्या हितासाठी दीर्घकाळ संघर्ष करणारे व्रतस्थ नेतृत्व हरपल्याची शोकभावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
तब्बल 12 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे गणपतराव उपाख्य आबासाहेब देशमुख म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी आदरणीय व्यक्तिमत्व . साधी राहणी व उच्च विचार या उक्तिनुसार ते कायम वागले. विशेषत: शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधानसभा गृहात दीर्घकाळ संघर्ष केला. त्यांचा बाणा अतिशय अभ्यासू होता. प्रत्येकाला वडिलकीचा सल्ला देणारे आबासाहेब यापुढे आपल्यात नसतील यावर विश्वास बसत नाही , असेही आ सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे