शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या भागावर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता स्वॅब टेस्ट कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण २३ नवे रुग्ण सापडले असून कोरोना तपासणी संख्याही वाढवण्यात आली आहे.

वरवली धुपेवाडी येथे एकाच वाडीत २५ जणांना कोरोना झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर या भागात आरोग्य यंत्रणेने टेस्टची संख्या वाढवली आहे. या वाडीत आणखी १२ नवे रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात मागील २४ तासांत २३ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ९, ७६४ झाली आहे.

४०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बुधवारी सहा जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या ९, २८९ झाली आहे.

corona update, khed, varavli, खेड, रत्नागिरी, वरवली

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *