दापोली : १४ जानेवारी ते २८ जानेवारीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विभागीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

24 जानेवारी रोजी रामराजे कॉलेज दापोली येथे विविध स्पर्धांमधून अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समूहगायन स्पर्धेत प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांस प्रशाळेतील मुख्याध्यापक प्रमोद गमरे, सहा. शिक्षक राजेश नरवणकर, क्रीडाशिक्षक बिपिन मोहिते आदींचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशवंत विद्यार्थी-शिक्षक यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष रमेश तळवटकर विश्वस्त साठले गुरुजी, शालेय समिती अध्यक्ष विवेक भावे, संस्था सचिव विराज खोत, संस्था सदस्य मनोज बादल, मनोज पवार, नियामक मंडळ अध्यक्ष संजय भावे, नियामक मंडळ सदस्य वैभव वराडकर शालेय समिती सदस्य जनार्दन बटावळे, विश्वेश जोशी, प्रेरणा भोसले, सर्व सभासद व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.