दापोली – दापोली तालुक्यातील वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूलमध्ये शिकून गेलेल्या सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच या विद्यालयात साजरा झाला.
या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यालयाची गरज ओळखून या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयास शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी उपयुक्त ठरेल असा कॉम्प्युटर व प्रिंटर सेट भेट दिला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण सिदनाईक यांच्याकडे हा संच समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी माजी विद्यार्थी सूर्यकांत जाधव, मिलिंद धुमाळ, सुदेश धुमाळ, जगन्नाथ जाधव, रमेश काटकर, श्रीकांत कदम तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.