उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण सध्या विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. याआधी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तर प्रदेशात एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांना करोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.