दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आणि आपल्याला सतत सुरक्षित ठेवणाऱ्या पोलीस बांधवांसाठी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या.

यासोबतच जवान आणि पोलीस बांधवांप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे लिहून त्यांना पाठवण्यात आली.

हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम गैबी, मुख्याध्यापिका मारिया अझर सारंग आणि उपमुख्याध्यापिका सानिया शेख उपस्थित होत्या.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली.