रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. हा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारनं हा संभ्रम संपवून एकदाच या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान देशभरातील जवळपास ७० टक्के विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी परीक्षाही घेतल्या आहेत. देशभरातील विद्यापीठे ‘यूजीसी’च्या सूचनांनंतर परीक्षेचं नियोजन करत आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत ‘यूजीसी’ने ६ जुलै रोजी विद्यापीठांना सुधारित सूचना केल्या होत्या.
त्यानंतरही राज्य सरकारने परीक्षा न घेताच पदवी देण्याची भूमिका कायम ठेवली. या लढाईत विद्यार्थ्यांचा जीव जातोय हे मात्र नक्की.