रायगड : प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.

खा. उदयनराजे भोसले आणि चंद्रकांत पाटील

प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात अल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह इतिहास अभ्यासक चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, पंकज चव्हाण यांची सदस्यपदी नियुक्ती आज जाहीर झाली आहे.

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक मोठा वारसा आहे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात किल्ले अजिंक्यतारा सह एकूण २५ पेक्षा अधिक गड किल्ले आहेत. या गडांना झळाळी देणे, ऐतिहासिक ठेव्यांचे संरक्षण करणे. त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे अशा मोठ्या जबाबदाऱ्या प्राधिकरणाच्या निमित्ताने पार पाडल्या जातील. उदयनराजेंकडे मोठी जबाबदारी येणार असे संकेत यापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार केंद्राच्या निर्देशाप्रमाणे उदयनराजेंना प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याच्या इतिहासाला झळाळी देण्याची एक नवी संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे..यामुळे उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.