ज्यांनी कोरोना लसीचे दोन लस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळे कोव्हिडची लस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.