दापोली :- स्थानिक अन्वेषण विभागाने दापोली तालुक्यातील माटवण येथून दोन बंदुका ताब्यात घेतल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै २०२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार अवैध धंद्याविरोधी कारवाईसाठी गस्त करीत असताना, त्यांना माटवण फाटा येथे एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसला. त्याच्याकडे एक प्लॅस्टीक गोणपाट होते. पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी करता व त्याची झडती घेता, त्याच्या ताब्यातील गोणपाटात एक सिंगल बॅरेल काडतुसाची बंदुक आणि एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदुक अशा दोन बंदुका मिळुन आल्या. सदर बंदुका बाळगणा-या संशयित आरोपीचे नांव प्रमोद एकनाथ नाचरे , (वय २७ वर्षे , रा. पिसई , येसरेवाडी , ता.- दापोली) असे आहे. सदर घटनेबाबत पोह . शांताराम झोरे , ने.- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या फिर्यादीवरुन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.उपनिरी . श्री निनाद कांबळे हे करीत आहेत . यातील संशयितास न्यायालयात हजर केले असता , त्यास दंडाधिकारीय कोठडी देण्यात आली . पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीत पोह . प्रशांत बोरकर , सुभाष भागणे , शांताराम झोरे , बाळू पालकर , पोना . उत्तम सासवे , पोशि . दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला . डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी वरील पथकाचे अभिनंदन केले आहे .