रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात, चार जण जखमी

कुर्धे फाटा येथे बसच्या धडकेत तीन प्रवासी जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस-गावखडी मार्गावर कुर्धे फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एका बसने दुसऱ्या बसला धडक दिल्याने तीन प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच १४ बीटी २९९१ ही रत्नागिरी ते अणसुरे (राजापूर) सागरी महामार्ग क्रमांक ४ वरून प्रवासी घेऊन जात असताना, कुर्धे बस स्टॉप येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता भरधाव वेगात चालवल्यामुळे अपघात झाला. या अपघातात पियुषा राजाराम हातकर (१९), सुनंदा शाम जागळे (७५), पुंडलिक शिवराम गोळपकर (७३) आणि विनायक आत्माराम गुरव (५२) हे प्रवासी जखमी झाले. पूर्णगड पोलिसांनी आरोपी चालक निलेश रावण पाटील (३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुकीवली सोनारवाडी येथे बस आणि कारची समोरासमोर धडक, कारचालक जखमी

खेड तालुक्यातील सुकीवली सोनारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारचालक गोरख मोहन वागस्कर (३५) हे जखमी झाले. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच २० बीएल १४३६ चा चालक सतीश जगन्नाथ जगदाळे (३६) याने रस्त्याची परिस्थिती न पाहता बेदरकारपणे बस चालवल्यामुळे हा अपघात झाला. खेड पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*