टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घागला चिपळूण पोलिसांकडून हॉटेलमध्ये जेवण; एसपींकडून कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी : हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या टीडब्ल्यूजे (ट्रेड विथ जॅझ) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संकेश घाग याला चिपळूण पोलिसांनी अटक केल्यानंतर, त्याला हॉटेलमध्ये जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे.

संकेश घाग हा टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक/शाखा व्यवस्थापक होता. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीला पुण्यातून अटक करून चिपळूण पोलिसांनी न्यायालयात हजर केले. २७ जानेवारी रोजी न्यायालयाने त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, न्यायालयात हजर करताना पोलिसांनी आरोपीला हॉटेलमध्ये जेवण घेण्यास परवानगी दिल्याचा व्हिडीओ/प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत एसपी नितीन बगाटे यांनी सांगितले की, “या प्रकरणाची गंभीर दखल घेत आम्ही चिपळूण पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पोलिसांचे म्हणणे आम्ही मागवले आहे.” गुंतवणूकदारांनी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती आणि सत्र न्यायालय परिसरात गर्दी केली होती.

**पोलीस भरतीत गैरप्रकार टाळा** 
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरतीदरम्यान भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक, बोगस दलाल किंवा इतर कोणी ओळखीचा गैरफायदा घेऊन पैसे मागितल्यास किंवा नोकरीचे अमिष दाखविल्यास, तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसपी बगाटे यांनी केले. अशा गैरप्रकारांची तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*