दापोली ट्रीपल मर्डर उघडकीस, एकाला अटक

रत्नागिरी व दापोली पोलीसांची दमदार कामगिरी

दापोली – येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आलं आहे. आर्थिक कारणावरून गुन्ह्याचे अमानुष कृत्य केल्याची आरोपीकडून कबुली देण्यात आली आहे.

ऐन संक्रांतीचे सणाचे दिवशी दिनांक १४/०१/२०२२ रोजी दापोली तालुक्यातील मौजे वणौशी ७६ वर्ष ) अज्ञाताकडून डोक्यात घाव घालून गंभीर दुखापती करुन त्यानंतर त्यांना अर्धवट जाळून तर्फे नातू , खोतवाडी येथे घरात एकटया रहाणाऱ्या तीन वयोवृद्ध महिलांचा ( वय १०१ वर्षे ७६ वर्षे , जीवे ठार मारुन त्यांच्या अंगावरील रु . १,६२,१५० / – कि.चे सोन्याचे दागिने व घरातील पैसे चोरीस गेल्याची अत्यंत क्रूर घटना घडलेली होती.

सदर घटनेबाबत दापोली पोलीस ठाणे येथे तशी फिर्यादी यांनी अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली होती. सदर महिला या एकटयाच रहात असल्याने व वाडीतील आजूबाजूचे घरातील लोकही कामधंद्यानिमित्त मुंबई येथे रहात असल्याने गुन्हयाची उकल होणेकामी अडचणी येत होत्या.

घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तसेच गुन्हयाची जलद उकल करणे हे पोलीसांपुढील आव्हान असल्याने पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड शशिकिरण काशिद यांचेकडे सोपविला .

तसेच घडलेल्या घटनेच्या गांभिर्याप्रमाणे पोलीस अधीक्षक रत्नागिरी मोहित कुमार गर्ग यांनी स्वत: घटना ठिकाणी ठाण मांडून सर्व बाजूंची पडताळणी करण्यास सुरुवात करुन तपासाची सर्व सूत्रे स्वतः हाती घेतली.

गुन्ह्याचे घटनास्थळ हे कमी लोकवस्तीचे ग्रामीण भागातील असल्याने तसेच आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हयाचा उलगडा होण्याकरीता जिल्ह्यातील हुशार अधिकारी व अंमलदार यांचे अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी -१, पोलीस उपअधीक्षक -१, पोलीस निरीक्षक -१, सहा.पोलीस निरीक्षक -६, पोलीस उपनिरीक्षक -३ याप्रमाणे ५ पथके तयार केली व त्यांना घटनास्थळाचे निरीक्षणा पासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत वेगवेगळी कामे नेमून देण्यात आली होती.

सदर पथकातील अधिकारी हे प्रत्येक गुन्हयाचा पैलू प्रत्यक्षात आणून आपले कौशल्य पणाला लावत होते . त्यातच वणौशी खोतवाडी गावातील लोकांकडे कसून तपास करताना सदरील वयोवृध्द महिला या गावातील गरजू लोकांना पैसे देत असल्याने त्यांच्याकडे पैशाची उपलब्धता असल्याने झालेली घटना ही जाणकार व्यक्तीकडून झालेली असावी हे पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांना व त्यांच्या टिमला जाणवले.

त्यादृष्टीने तपासाचा गाव व आजूबाजूचे ओळखणारे लोक हा केंद्रबिंदू ठरविण्यात येऊन तपास पथकातील टिमला तशा सूचना देण्यात आल्या.

त्याप्रमाणे तपास पथकाने गावात व मयत यांच्या ओळखीचे लोकांकडे तपास करण्यात सुरुवात केली असता घटनेशी निगडीत गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली. घटनेच्या अनुषंगाने काही संशयित हेरण्यात पोलीसांना यश मिळाले.

त्यामध्ये त्याच गावचा रहिवाशी मात्र सध्या मुंबई येथे रहाणारा रामचंद्र वामन शिंदे वय ५३ वर्षे रा. वणीशी तर्फे खोतवाडी ता . दापोली हा आघाडीवर होता. तपासा दरम्यान रामचंद्र शिंदे याचेकडे पोलीसांचे पथकाने कसून चौकशी केली तेव्हा
त्याचेकडून प्रत्येक वेळी तपास पथकाला वेगवेगळी माहिती त्याने सांगितली.

रामचंद्र शिंदे केल्यावर त्याला योग्य व घटनेशी संयुक्तिक उत्तरे देता आली नाहीत. पोलीसां पुढील चौकशीमध्ये पोलीसांनी घटनेदरम्यानच्या त्याच्या हालचालींबाबत त्याचेकडे चौकशी करून प्रश्नांची सरबत्ती याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी काळात त्याच्या संशचित हालचाल पोलीसांनी टिपल्या.

आपले वाईट कृत्याचे पितळ उघड झाले आहे अशी आरोपीची खात्री होताच त्याने पोलीसांपुढे आपल्या केलेल्या वाईट कृत्याची कबुली दिलेली आहे. अत्यंत गरज असल्याने मयत तीन महिला घरात एकटयाच असल्याने त्यांना मारुन चोरी करणे प्राथमिक तपासात आरोपीने सदरचे कृत्य हे तो कर्जबाजारी झाल्याने व त्याला पैशांची सहज शक्य असल्याने केल्याचे आरोपीने सांगितले आहे.

गुन्हा उघडकीस आला असला तरीदेखील इतर पैलूवर तपास चालू असून त्यादृष्टीने पुढील अधिक तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे . सदर गंभीर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मा . श्री . राजेंद्र सिंह अपर पोलीस महासंचालक , वेळोवेळी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले आहे.

यावेळी सदर गुन्हा उघडकीस आणल्याने राजेंद्र सिंह- अपर पोलीस महासंचालक , ( का . व सु . ) , मुंबई व संजय मोहिते , पोलीस उपमहानिरीक्षक , कोंकण परिक्षेत्र यांनी वरील तपास पथकाचे अभिनंदन केलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांच्या सुचनेप्रमाणे जयश्री देसाई, अपर पोलीस अधीक्षक , रत्नागिरी , एस.रुषीकेश रेड्डी , परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, शशिकिरण काशिद उपविभागीय पोलीस अधिकारी , खेड, पोनि / विनीत चौधरी , सपोनि / मनोज भोसले , रत्नागिरी शहर पोलीस ठाणे , सपोनि / नितीन ढेरे दापोली पोलीस ठाणे , सपोनि / प्रविण स्वामी , सपोनि / रत्नदिप साळोखे- चिपळूण पोलीस ठाणे , सपोनि / सुजित गडदे खेड पोलीस ठाणे , पोउनि / संदिप वांगणेकर – स्थागुअशा , पोउनि / निनाद कांबळे , मपोउनि / शीतल पाटील , पोउनि / विनायक माने , चिपळूण पोलीस ठाणे, पोटफोडे अंगुली मुद्रा तज्ञ , डॉग स्कॉड , मोबाईल फॉरेन्सिक युनिट , रत्नागिरी या पथकाने पार पाडलेली आहे. पथकाचे या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रोख २५,००० / – रुपयांचे बक्षीस देवून तपास पथकास सन्मानित केलेले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*