रत्नागिरी : प्रभाग क्रमांक ९ मध्ये पोलीस हेडक्वार्टर येथील शाळा क्रमांक १२ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रभाग क्रमांक ९ मधील पोलीस हेडक्वार्टर येथील शाळा क्रमांक १२ च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साही वातावरणात पार पडले.

प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विजय खेडेकर आणि नगरसेविका सायली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी माजी नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक अभी धुडे आणि प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांचीदेखील विशेष उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा