संगमेश्वर : पर्यावरणाच्यादुष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीच्या महत्वकांक्षी संकल्पना समोर ठेऊन राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबिवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावात वृक्ष लागवडीवर जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे, असे सरपंच सुनील म्हादे यांनी सांगितले.
नवीन लागवडी साठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लावणाऱ्या रोपांची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत पांगरी मार्फत सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षांची मागणी करण्यात आली. गावातील प्रत्येक घरपट्टी धारकांना लाभ मिळणार आहे. वृक्ष वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला.
त्यावेळी ग्रामपंचायत कार्यकारणी, सदस्य व गावातील जेष्ठ मान्यवर, सामाजिक कार्यकर्तें, यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सुनील म्हादे यांचे हस्ते वृक्ष वाटप कार्यक्रमाचा सुभारंभ करण्यात आला.