दापोलीच्या मुरुड येथे घर दुरुस्ती दरम्यान दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे २०२५ रोजी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी त्यांच्या घराच्या खिडकी दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी अज्ञानी विष्णू वरवडेकर, चैताली अज्ञानी वरवडेकर आणि अतुल सावंत (सर्व रा. मुरुड, ता. दापोली) यांनी फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला घराबाहेर जाण्यापासून रोखले, हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*