खेड पोलीसांनी चोराला अवघ्या सहा तासात घेतले ताब्यात

खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासात मुसक्या आवळून गजाआड केले.

नदीम तांबे असे या चोरट्याचे नाव असून तो त्याच परिसरातील रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील तांबे मोहाला येथे राहणाऱ्या उजमा नाकीब तांबे (२८) व त्याच्या घरातील अन्य सदस्य आज दावतसाठी नातेवाईकांकडे गेले होते.

ही संधी साधून याच परिसरातील स्टर्लिंग इमारतीत राहणार नदीम तांबे याने त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी उचकडून घरात प्रवेश केला. त्याने पलंगामध्ये असलेले २ लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरून नेला.

उजमा तांबे घरी आल्यावर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ खेड पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून चोरट्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसताना चोरटा नदीम याला सहा तासांच्या आता गजाआड केले. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*