रत्नागिरी:- दुबई, ओमान, कुवेतसह अन्य देशांतून जिल्ह्यात आलेल्यांमध्ये २८ जणांची भर पडली आहे. परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची एकूण संख्या ७४ वर पोचली आहे. परदेशातून आलेल्यांची यादी विमानतळावरून जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आली होती. गुरूवारी आलेल्या यादीमध्ये ४६ जणांचा समावेश होता. त्यात भर पडली असून आणखीन काही परदेशी लोक गावाकडे परत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.