रत्नागिरी: शिमगा उत्सवाच्या संदर्भात जिल्हाधिकारीनी दिलेल्या नियमात बदल केले असून पालखी घरी नेण्यास संदर्भात जी बंदी घातली होती. या संदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी यांनी नवीन आदेश दिला आहे. कोरोनाच्या संदर्भातील सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी पालखी आता नेता येणार आहे. अशा पंचवीस लोकांची कोरोना विषाणूंच्या अनुषंगाने योग्य ती आरोग्यविषयक चाचणी करून घेणे आवश्यक राहील असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.