राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शासकीय आयटीआयमध्ये ९१.८५ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत.तर खासगी आयटीआयमध्ये केवळ ५५.५१ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
