जिल्ह्यात सरासरी 102.73 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी– जिल्ह्यात 24 तासात सरासरी 102.72 मिमी तर एकूण 924.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 106.10 मिमी, दापोली 169.70 मिमी, खेड 140.30, गुहागर 132.40 मिमी, चिपळूण 128.00 मिमी, संगमेश्वर 69.30 मिमी, रत्नागिरी 66.90 मिमी, राजापूर 59.40 मिमी,लांजा 52.50 मिमी.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 20 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

दापोली तालुक्यात मौजे हर्णे येथील विक्रांत अनंत मयेकर यांच्या गाडी पार्कींग मध्ये पाणी शिरल्याने गाडीचे 1 लाख 20 हजाराचे नुकसान. मौजे बुरोंडी येथील हाजिरा ईस्माईल बुरोडकर यांच्या घराचे अंशत: 15 हजार रुपयांचे नुकसान. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे ओणनवसे-गुडघे-उंबरघर रस्ता खचला आहे. वाहतूक सुरु आहे. खेड तालुक्यात मौजे खेड येथील खेड-दापोली रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने सकाळी वाहतूक सुरळीत झाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*