वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. या पदासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी डॉ. लहाने यांनी प्रयत्न केले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर मंत्रालयात नुकतीच दीर्घकाळ चर्चा झाली. पण देशमुख यांनी डॉ. लहाने यांना मुदतवाढ मिळू शकले नाही त्यामुळे अखेर त्यांना बुधवारी सेवानिवृत्त करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली. रुग्णांसाठी धावून जाणारा डॉक्टर अशी तात्याराव लहाने यांची राज्यभर ख्याती आहे. ‘डोळ्याचे डॉक्टर म्हणजे लहाने’ अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.