राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. या विद्यापीठासाठी जगभरातील प्रगत देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ऑनलाईन विद्यापीठाचा अभ्यास केला जाणार आहे.ऑनलाईन विद्यापीठाच्या या अभ्यासासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. के. शेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती गठित केली आहे. ही समिती जगभरातील प्रगत देशांमध्ये स्थापन झालेल्या ऑनलाईन विद्यापीठाचा अभ्यास करून त्या धर्तीवर राज्यातील ऑनलाईन विद्यापीठाच्या संदर्भातील धोरण निश्चित करेल.