मुख्‍यमंत्री स्‍वत: कार चालवत पंढरपूरच्‍या दिशेने रवाना

मुंबई:-आषाढी एकादशी निमित्त पंढपूर विठ्‍ठल मंदिरात मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते मंगळवारी पहाटे महापूजा होणार आहे. मात्र मुंबईत दिवसभर कोसळणार्‍या पावासमुळे त्‍यांना  हवाईमार्गाने पंढरपूरला जाणे अशक्‍य झाले. त्‍यामुळे उद्धव ठाकरे हे रस्‍ते मार्गानेच पंढरपूरला रवाना झाले. मागील वर्षी प्रमाणे ते स्‍वत:चालवत पंढरपूरला रवाना झाले. सोमवारी दुपारी साडेतीनच्‍या सुमारास मुख्‍यमंत्री मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा मुंबई-पुणे एक्‍सप्रे वेवरुन पंढपरूच्‍या दिशेने रवाना झाला. स्‍वत: उद्धव ठाकरे हे कार चालवत होते. मंगळवारी पहाटे २.२० मिनिटांनी होणार्‍या महापुजेला मुख्‍यमंत्री सपत्‍निक उपस्‍थित राहतील.महापुजा झाल्‍यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्‍हा मुंबईला रवाना होणार आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*