पाय मोकळे करून येतो सांगून गेलेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह

दापोली : दापोली तालुक्यातील पालगड रोहिदासवाडी येथे गोविंद धयाळकर (85) हे दम्याच्या आजाराने त्रस्त होते. 8 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी “मी पाय मोकळे करून येतो”, असे घरच्यांना सांगून निघून गेले.

रात्री उशिरापर्यंत न परतल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सोंडेघर धरणाच्या पाण्यात आढळून आला.

याबाबतची फिर्याद शांता धयाळकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस फौजदार चव्हाण करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*