दापोलीच्या तेजलची इस्रो भेटीसाठी निवड!

इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तेजल घेत आहे शिक्षण

दापोली : शहरातील स्नेहदीप संस्थेच्या इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील तेजल दिनेश कदम या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. दरवर्षी निवडक विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये भेट देण्यासाठी नेले जाते, यंदा त्यात तेजलची निवड झाली आहे.

इस्रोची (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) क्षेत्रभेट आणि अभ्यास दौऱ्यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची निवड होते. निरीक्षणातून अभ्यास, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

यावर्षी दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मिळालेली अपूर्व संधी आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने दिव्यांगांसाठी दिलेले ही अनमोल भेट आहे.

तेजलच्या या यशासाठी नुकताच इंदिराबाई वामन बडे विद्यालयात तिला शुभेच्छा देण्यासाठी कौतुक सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तिच्यासोबत तिचे पालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, हितचिंतक, संस्था चालक उपस्थित होते. हा अभ्यास दौरा दिनांक १६ ते २० मार्च दरम्यान इस्रो येथे होणार आहे.

तेजल सोबतच रत्नागिरीतील द. न्यू. एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील अनन्या मूरकर हीची सुद्धा निवड झाली आहे.

तसेच या शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती सीमा मुळ्ये यांचाही या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे.

तेजलच्या या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*