दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूलची म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले येथे मुख्याध्यापक सतीश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ए. जी. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी जान्हवी आचरेकर, कनक सहस्त्रबुद्धे, तन्वी वैद्य, श्रेयांगी शेडगे यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात अध्यापनाचे कार्य केले.
यावेळी श्रुती झाटे, अक्षरा खापरे, जानवी रसाळ तसेच हर्ष काष्टे या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. तसेच छात्र अध्यापनाचे कार्य करताना आलेले अनुभव जान्हवी आचरेकर, कनक सहस्रबुद्धे, तन्वी वैद्य, श्रेयांगी शेडगे यांनी कथन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांचे व शाळेचे आभार मानले.
या निमित्ताने अध्यक्षीय मनोगतामध्ये डी. आर. जाधव यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खटावकर एम. डी .यांनी केले. सूत्रसंचालन चेतन राणे यांनी केले तर आभार मीरा साठे यांनी मानले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सतीश जोशी, उपमुख्याध्यापक एस. एम. कांबळे, पर्यवेक्षक एस. डी. माळी, पर्यवेक्षक डी. एम. खटावकर यांचे मार्गदर्शन लाभले.