शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.
शिक्षकांच्या समोर जूनी पेन्शन तथा शिक्षण सेवक मानधन वाढ हे प्रश्न आजरोजी प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत. सदरचे प्रश्न सोडवणे साठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सदैव प्रयत्नशील आहे.
बक्षी कमिटीने किमान वेतन 18000 रुपये सुचवले आहे मात्र नवनियुक्त प्राथमिक शिक्षक सध्या 6000 ते 9000 या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. रोजगार हामी योजनेत रोजंदारीवर काम करणाऱ्या अकुशल मजूरापेक्षा हे कमी मानधन असल्याने शिक्षक वर्गात कमालीची नाराजी आहे. तरीही सहाय्यक शिक्षकांना १७ मार्च २०१२ नंतर कोणत्याही प्रकारची वेतनवाढ दिलेली नाही, यामुळे नवनियुक्त शिक्षकांत तिव्र नाराजी पसरली आहे.
दापोली येथे दि.३०.१०.२०२० रोजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, आमदार योगेशदादा कदम आणि महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा असल्याने शिक्षक समितीच्या वतीने सहायक शिक्षक मानधन वाढ करावी त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करून परिवक्षाधिन कालावधी कमी करावा या एकमेव मागणीसाठी निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
मा. रोहन बने यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेवून सदरचा विषय अधोरेखित करणार असल्याचे सांगितले तर आमदार योगेशदादा कदम यांनी शिक्षण सेवक मानधन वाढ हा तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री नाम. अब्दुल सत्तार साहेब यांचेशी चर्चा करताना नवनियुक्त शिक्षकांच्या कुटुंबाची मात्र सहा हजार रुपये मानधन असल्याने कशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे व या विषयाची दाहकता किती प्रमाणात शिक्षकांवर परिणाम करत आहे, याची माहिती राज्यमंत्री यांना शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने दिली आहे.
सदरचा विषय इतर राज्यात कशाप्रकारे हाताळला गेला याचीही माहिती राज्यमंत्री यांना देण्यात आली असून मंत्री महोदय स्वतः सऱ्हदयी व्यक्तीमत्व असल्याने बऱ्याचशा बाबींविषयी त्यांनी सहानुभूती दाखवली आहे व पुढील अधिवेशनात निर्णय करण्याविषयी आश्वासन दिले आहे, असे सरचिटणीस जावेद शेख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक वाळंज, दापोली कार्यालयीन चिटणीस पंकज वानखडे, माधव तिरुके इ. शिक्षक बांधव उपस्थित होते.