रत्नागिरी : Tauktae चक्रीवादळा धोका कोकणाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा सकर्त झाली आहे. किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेगळ ४० ते ७० किलोमीटर प्रती तास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने पुढे सरकू लागलं आह. कोकण किनारपट्टीवर येत्या काही तासातच याचे परिणाम दिसायला सुरूवात होती. माय कोकणच्या माध्यमातून या चक्रीवादळा बाबत घडत असलेल्या घडामोडींचा लाईव्ह अपडेप देत आहोत.

Watch : https://youtu.be/MjdQXvvnYB4

१५ मे २०२१ / सायं. 8 : 20

१५ मे २०२१ / सायं. 8 : 20

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यत या टप्प्याटप्प्याने या वादळाची तीव्रता जाणवणार असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी एक दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घरातच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीही ही संचारबंदी असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात रविवारी सकाळी राजापूरमध्ये किनाऱ्यावर समांतर जाणार असून काही गावांतील नागरिकांना स्थलांतरीत केले जाणार आहे. काही ठिकाणी स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पुर्णगडजवळ दुपारी 1, रत्नागिरी सायंकाळी 4 वाजेपर्यत, नेवरे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, दापोली सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत वादळ पोहचण्याची शक्यता आहे. ताशी 40 ते 90 किमी प्रमाणे वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

१५ मे २०२१ / सायं. 7 : 15
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी आज रत्नागिरी येथील मांडवी समुद्र किनाऱ्यावरती भेट देऊन प्रशासनाकडून घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि. प. सदस्य बाबु म्हाप, साहाय्यक मत्स्य आयुक्त, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१५ मे २०२१ / सायं. 06 : 20
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर येथे भेट देऊन प्रशासनाकडून घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यासमयी मच्छिमार व प्रशासन एकत्र येऊन आवश्यक ती सर्व काळजी घेत असून मच्छिमार बांधव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत असल्याचे उदय सामंत यांच्या निदर्शनास आले.

१५ मे २०२१ / दुपारी 02 : 50
रत्नागिरी शहरामध्ये ढगांच्या गडगडाटांसह पावसाला सुरूवात

१५ मे २०२१ / दुपारी 02 : 10
येत्या तीन तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. र्शया दरम्यान वाऱ्याचा ताशी 30/40 किलोमीटर प्रती तास राहिल. घराबाहेर पडताना सर्वांनी काळजी घ्यावी आणि मोठ्या वृक्षांचा आसरा कुणीही घेऊ नये.

१५ मे २०२१ / दुपारी 01 : 28
#CycloneTauktae #Ratnagiri
राजापूर व दक्षिण रत्नागिरी तालुक्याचा उत्तर भाग गुहागर आणि दापोली तालुक्यात किनाऱ्यावर 50km/hr किलोमीटर गतीने जोरदार वारे वाहणार असल्यामुळे रविवारपर्यंत कच्च्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

१५ मे २०२१ / दुपारी 01:01
कोकणाच्या दृष्टीनं येणारे 12 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने प्रशासन सज्ज झालं आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उत्सुकतेपोटी कुणीही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशी विनंतीही त्यांनी सर्वांना केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी एनडीआरएफ टीमच्या संपर्कात आहेत. सध्या एक टीम गोव्याला आणि एक टीम पुण्यात असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

१५ मे २०२१ / सकाळी 11:44
मुंबईमध्ये १०० जीवनरक्षण विविध समुद्रकिनाऱ्यांवर सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अग्निशामक दलालाही सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बांद्रा वरळी सी लिंक आज आणि उद्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

१५ मे २०२१ / सकाळी 10:41
चक्रीवादळामुळे अरबीसमुद्रवरील हवामान खराब झाल्यामुळे चेन्नई, तिरूवनंथपुरम, कोची, बंगळूरू, मुंबई, पुणे, गोवा आणि अहदाबाद येथील विनाम सेवेला 17 मे पर्यंत फटका बसण्याची शक्यता.

१५ मे २०२१ / सकाळी 10.23
NDRF या चक्रीवादळाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे.

१५ मे २०२१ / सकाळी १०:१०
Tauktae चक्रीवादळाची दिशा बदलल्यानं त्याची तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचलं आहे. तिथून ते आता पुढे सरकत आहे. कोकण किनारपट्टीवर येत्या काही तासातच हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ १८ मेच्या दरम्यान गुजरात किनारपट्टीवर पोहोचेल.

१५ मे २०२१ / सकाळी 10:00
पंतप्रधान नरेंद्र मोदी Tauktae चक्रीवादळा संदर्भात महत्त्वाची मिटिंग घेणार आहेत. यामध्ये या चक्रीवादळाशी समाना करण्यासाठीच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत.

१५ मे २०२१ / सकाळी 09:45
Cyclone Tauktae केंद्रीय पाणी आयोगा (CWC)नं केरळ, तामीळनाडूमध्ये पूराची शक्यता वर्तवलीये. पाणी आयोगानं शनीवारी केरळ आणि तामिळनाडू राज्यासाठी ऑरेंज बुलेटीन प्रसिद्ध केलं. यामध्ये त्यांनी पूराची शक्यता व्यक्त केली. आज सकाळी आठ वाजता केरळ आणि तामिळनाडूच्या तीन नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.