राज्यातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित असल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवावी असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.


मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज दिवसभर अधिवेशनामध्ये चर्चेत राहिला. मात्र याच मुद्द्यावरुन चर्चा करणाऱ्या भाजपाला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खडे बोल सुनावले आहेत. आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे असं आव्हाड म्हणालेत.

दुपारी विधानसभेच्या सदनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन सुरु असणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे