खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून देशात प्रथम आलेला नील पाटणे याचा समावेश आहे.

नील पाटणे, रोटरी स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा विद्यार्थी, याने आपल्या यशाने खेडचा नावलौकिक वाढवला आहे.

त्याच्यासह ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या इतर पाच विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

यांमध्ये पूर्वा साळवी (९९.८६%, कोकण विभागात दुसरी), आरुषी सावडे (९९.००%), आऐशा तिसेकर (९९.४२%), यश राऊळ (९९.८४%) आणि अभिषेक चव्हाण (९९.२४%) यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे गुरु रोहन खेडेकर आणि रोटरी स्कूलचे शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला.

खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा, शाल, श्रीफळ आणि हार घालून गौरव केला.

या कार्यक्रमाला शहरातील नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.