दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तब्बल 16 क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या विद्यार्थ्यांनी मिळवली आहे. सांघिक कबड्डी खेळात रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली असून, मैदानी स्पर्धेतही टाळसुरे विद्यालयाने आपली छाप पाडली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानात आयोजित या स्पर्धेत टाळसुरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे यश संपादन केले: 
-14 वर्षे वयोगट (मुले) : 100 मीटर धावणे – रुद्र सुधीर भुवड (प्रथम क्रमांक) 
– 17 वर्षे वयोगट (मुली): गोळाफेक – सिद्धी अविनाश थोरे (प्रथम क्रमांक) 
– 17 वर्षे वयोगट (मुले) : गोळाफेक – दीपराज लोंढे (प्रथम क्रमांक), भालाफेक – दीपराज लोंढे (द्वितीय क्रमांक) 
– 17 वर्षे वयोगट (मुले) : 100 मीटर धावणे – अथर्व बाबू डीके (प्रथम क्रमांक), 200 मीटर धावणे – अथर्व बाबू डीके (द्वितीय क्रमांक) 
– 17 वर्षे वयोगट (मुले) : 400 मीटर हर्डल्स – स्मित महेश लांजेकर (प्रथम क्रमांक) 
– 17 वर्षे वयोगट (मुले) : 100 मीटर हर्डल्स – वेदांत शिगवण (प्रथम क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट (मुली) : 100 मीटर हर्डल्स – तन्वी लाले (प्रथम क्रमांक), 100 मीटर हर्डल्स – श्रावणी शिवाजी पुरी (द्वितीय क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट (मुले) : लांबउडी – आदित्य प्रशांत राऊत (प्रथम क्रमांक), तिहेरीउडी – आदित्य प्रशांत राऊत (प्रथम क्रमांक), 400 मीटर हर्डल्स – आदित्य प्रशांत राऊत (प्रथम क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट (मुले) : 200 मीटर धावणे – गौरीज राजेश सणस (द्वितीय क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट (मुले) : उंचउडी – निखिल नरेश कुळे (द्वितीय क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट (मुले) : 400 मीटर हर्डल्स – देव राजेंद्र गोरीवले (द्वितीय क्रमांक) 
– 19 वर्षे वयोगट : 4×100 मीटर रिले – न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे संघ (विजेता) 

या यशस्वी कामगिरीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, अशोक जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत, मार्गदर्शक दीपनंदा बोधे, जीवन गुहागरकर, सुयोग लाले, महेश लाले, संजोग लाले यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.