मंडणगड किल्ल्यावरील झाडी झुडपात आणि दगडांमध्ये गाडलेले “मुख्य प्रवेशद्वार” प्रकाशात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ता. मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड व झाडी झुडपात लुप्त झालेला “मुख्य प्रवेशद्वार” अखेरीस प्रकाशात आला. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या दि.१० जुलै २०२२ रोजी अभ्यास मोहिमेदरम्यान गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच प्रवेशद्वार असून त्याचा घेरा/देवड्याचा परिसर २१ X २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढं आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून त्यावर ढासलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.