खेड पोलीसांनी रेल्वे थांबवून लावला “अपहरण” नाट्याचा छडा.
सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मीरा-भाईंदर वसई विटा आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं.वि.सं कलम 363 अन्वये गुन्ह्यातील 03 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असल्याबाबत व त्यांचे वर्तमान स्थान हे “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली.
