तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ओबीसी समाजाच्या संबंधित ठरावावरुन सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहातील गोंधळानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढतात. त्यावेळी तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. तर अशी धक्काबुक्की झालीच नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*