स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ मासिकाचे प्रकाशन, महाराष्ट्रभर प्रसाराचा संकल्प

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आणि योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी ‘स्वरूप सहकार’ या मासिकाचे प्रकाशन आज संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या मासिकाचे विमोचन आमदार रविंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष भा.ज.पा. महाराष्ट्र, यांच्या शुभहस्ते झाले.

याप्रसंगी बोलताना आ. चव्हाण यांनी, “स्वामी स्वरूपानंद पतसंस्था दीर्घकाळ विश्वासार्ह आणि वर्धिष्णू व्यवहार करत आहे. ‘स्वरूप सहकार’ मासिकाच्या माध्यमातून संस्थेची प्रतिमा आणि कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे पोहोचेल,” असे प्रशंसोद्गार काढले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आ. चव्हाण यांचा गणेश प्रतिमा देऊन सत्कार केला.

संस्थेच्या ठेव वृद्धी मासाचा प्रारंभ 20 जून 2025 पासून होत असून, 20 जुलै 2025 पर्यंत तो चालेल. आतापर्यंत संस्थेने 350 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून, या ठेव वृद्धी मासात मोठ्या प्रमाणात ठेव संकलन होईल, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

यानिमित्ताने संस्थेने आकर्षक ठेव योजनांची घोषणा केली आहे. ‘स्वरूपांजली ठेव योजना’ अंतर्गत 12 ते 18 महिन्यांसाठी सर्वसाधारण 8.50% आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी 9% व्याजदर, तर ‘सोहम ठेव योजना’ अंतर्गत 19 ते 36 महिन्यांसाठी (मासिक व्याज) सर्वसाधारण 8.25% आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी 8.50% व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. ॲड. पटवर्धन यांनी गुंतवणूकदारांना या सुरक्षित आणि आकर्षक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या प्रकाशन सोहळ्यास उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक प्रसाद जोशी, चार्टर्ड अकाउंटंट शैलेश काळे, अल्हाद मयेकर, राजन होतेकर, सुमुख घाणेकर, डॉ. डिंगणकर, गौरंग आगाशे, मंगेश गांधी, प्रवीण लाड, विनीत भट, अशोक शेटे, आनंद लिमये, रुपेश साळवी, नितीन देवरुखकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*