ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक दिवस लांबणीवर

नवी दिल्ली– ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे.  सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मंत्री व ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले,ओबीसी आरक्षण याचिकेवर उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. मध्यप्रदेशची केस देखील काहीशी आपल्या सारखीच आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता OBC प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

मध्य प्रदेशसाठी तुषार मेहता केस लढत आहेत. इतर राज्यामध्ये देखील आपल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उद्या निर्णय होणार असल्याचे समजते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*