वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही_ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. 12:- चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल तत्पूर्वी नदीतील गाळ काढल्याखेरीज पूररेषा निश्चित केली जाणार नाही असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे दिले.

चिपळूण येथील नागरिकांनी सहा डिसेंबर पासून चिपळूण मधील पूरस्थिती बाबत साखळी उपोषण सुरू केले आहे त्या उपोषणकर्त्या नागरिकांना आज उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी स्थानिक आमदार शेखर निकम हे त्यांच्या समवेत होते.

याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की गाळ काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे तथापि या कामासाठी जो काही निधी लागणार आहे तो निधी शासन उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.

याप्रकरणी नागरिकांनी पक्षविरहित आंदोलन उभे केले याची दखल शासनाने घेतली आहे व शासनातील एक मंत्री या नात्याने मी निश्चितपणे चिपळूणकरांची भूमिका मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्याकडे मांडणार आहे आणि चिपळूणकरांना न्याय मिळवून देण्यात माझी भूमिका पार पाडणार आहे. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात त्या अनुषंगाने काम सुरू करण्यात येईल यासाठी तातडीची बाब म्हणून साडे नऊ कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले आहे उर्वरित निधी देण्यास आराखडा तयार झाल्यावर,प्रस्ताव आल्यानंतर मान्यता देण्यात येईल असे ते म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*