
दापोली: नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सचे दापोलीतील पत्रकार यशवंत कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना सन्मानित केले.
कांबळे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडले असून त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख आणि जबाबदार असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.
श्री जोगेश्वरी माता प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात तटकरे यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियाच्या स्पर्धेतही कांबळे यांनी सत्य आणि वस्तुनिष्ठतेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या लेखनातून नेहमीच समाजहिताचा विचार दिसून येतो. या सोहळ्यात कांबळे यांना तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नागोठणे पत्रकार असोसिएशन गेल्या १४ वर्षांपासून पत्रकार आणि गुणवंतांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply