दापोलीचं नाव इंग्लंडमध्ये चमकलं, सुलतानची चमकदार कामगिरी

दापोलीतील शौकत इलेक्ट्रीकल्सचे मालक शौकत काज़ी यांचे चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांने शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंड भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागामध्ये सुलतान प्रथम आला आहे.

त्यानं आपल्या भरीव कामगिरीच्या जोरावर इंग्लंड मधील कट दि मर्स्टड या नामांकित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या कंपनीत मोठया पगाराची नोकरी मिळवली आहे. त्यानं आपल्या या कर्तृत्वामुळे दापोली शहराचे नांव इंग्लंड सारख्या देशामध्ये मोठं केले आहे.

सुलतान शौकत काज़ी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्यामुळे स्टाफोर्डशायर विद्यापिठाच्या संबंधीत विभागानं वेबसाईटला त्याचा लोगो प्रकाशित केला आहे. ही खूप मानाची गोष्ट आहे.

सुलताननं आपल्या यशाचं श्रेय विद्यापीठातील प्राध्यापकांना, पालकांना आणि मित्र परिवाराला दिला आहे. या विद्यापीठात शिकताना खूपच चांगला अनुभव राहित्याचंही त्यानं म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*