दापोली :- दापोली तालुक्यातील जालगाव बौद्धवाडी येथे आनंद तुळशीराम कुठेकर वय ६२ या ज्येष्ठ नागरिकाने आज रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
दापोली तालुक्यातील जालगाव बौद्धवाडी येथे आनंद तुळशीराम कुठेकर यानी आज दुपारी रहात्या घरी आजाराला कंटाळून गळफास लावुन आत्महत्या केल्याची तक्रार जालगावचे पोलीस पाटील देवेंद्र शिंदे यांनी दापोली पोलीस स्थानक येथे नोंदविली असून या घटनेचा अधिक तपास करण्याची लेखी विनंती केली आहे.