वराडकर बेलोसेत चांद्रयान-३ ची यशोगाथा उलगडली

अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात – डॉ. दशरथ भोसले

दापोली – अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात आहे. चंद्रयान-३ अवकाश संशोधकांना नवी दिशा देणारे ठरेल. अनेक शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण करून देशाला जगात मानाचे स्थान मिळाले आहे, असे प्रतिपादन आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशनचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी व्यक्त केले.

दापोली येथील वराडकर बेलोसे महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागाने आयोजित केलेल्या ” चंद्रयान -३” या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत यांनी त्यांच्या भाषणात चंद्रयान-3 साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, विविध शास्त्रज्ञांचे इस्रो संस्थेच्या कार्यातील योगदान, चांद्रयान प्रक्षेपण प्रक्रियेची शास्त्रीय माहिती उलगडली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी . डी. कऱ्हाड यांनी सर्वांचे स्वागत केले, आणि चंद्रयान -3 विषयी मार्गदर्शन करतांना विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरला चंद्राच्या दक्षिण ध्रुविय पृष्ठभागावर सल्फर, अल्युमिनियम, मॅग्नीज,आयर्न, सिलिकॉन आणि ऑक्सिजन चे मूलद्रव्य सापडले आहेत. प्रज्ञान रोवर कडून हायड्रोजनच्या उपलब्धतेबाबत पडताळणी सुरू असुन चंद्राच्या पृष्ठभागावरील हवामान, सॉईल टेक्सचर, पाणी बाबतचा चा सखोल अभ्यास सुरू असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन करतांना एनएसएस कार्यक्रम आधिकरी डॉ.जयश्री गव्हाणे यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर संपूर्ण जगाचे लक्ष असून संपूर्ण जग इस्रो कडे नव्या आशेने पाहत आहे, इतर देशांपेक्षा भारताने खूपच कमी बजेट मध्ये चांद्र्यानाचे प्रक्षेपण करून जगाला आश्चर्यचकित केले आहे, अशी माहिती दिली.

शेवटी प्रा. मालदेव कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जेसीआय दापोलीचे समीर कदम, ऋत्विक बापट, डॉ.स्वप्नील मेहता, डॉ.पियूष सोंजे, डॉ. ओमकार बागडे, सर्व प्राध्यापक व विद्यार्धी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*